सदस्य नोंदणी
Back

महासंघाची सदस्यता

१) आंतरराष्ट्रीय अध्यक्ष

हे एकमेव पद राहील ज्याच्या अधीन संपूर्ण विश्वातील विश्व हिंदू महासंघाचे सर्व देशातील राष्ट्रीय अध्यक्ष असतील.

२) भारतीय महासंघाचे अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष हे ही एकमेव पद असेल आणि या पदावर श्री गोरखपीठाधीश्वर महंत यांच्याद्वारे नियुक्त केलेला व्यक्ती अध्यक्ष राहील.

३) राष्ट्रीय अध्यक्षांचे अधिकार

हे संस्थेचे सर्वोच्च अधिकारी असतील. सामान्य परिस्थितीत जर त्यांनी कार्यकारिणीची बैठक घेणे आवश्यक वाटेल तेव्हा घेऊ शकतात. संस्थेच्या विवादात्मक आपापकालीन परिस्थितीत हस्तक्षेप करून निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांच्या निर्णय संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांना बाध्य असेल.

आजीवन सदस्य

संस्थेचे आजीवन सदस्यत्व घेण्यासाठी ..रूपये भरून घेता येईल. आजीवन सदस्य संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य अथवा पदाधिकारी बनू शकतात.

सक्रिय सदस्य

ज्या सदस्यला अध्यक्षांनी मान्यता दिली आहे तो सदस्य .. शुल्क भरून सदस्य होऊ शकतो. सक्रीय सदस्य निवडीद्वारे कार्यकारिणी सदस्य किंवा पदाधिकारी बनू शकतो.

विशेष आमंत्रित सदस्य

संस्था मार्गदर्शनासाठी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना विनाशुल्क सदस्यत्व देते. असे सदस्य विशेष सभेत भाग घेऊन त्यांचा सल्ला देऊ शकतात पण त्यांना मतदानाचा अधिकार असणार नाही.

सदस्यत्व रद्द होण्याची कारणे:

संघटन संरचना

संघटनात्मक समित्या:

  • प्रदेश कार्य समिती
  • जिल्हा कार्य समिती
  • तालुका कार्य समिती
  • जिल्हा परिषद कार्य समिती
  • ग्राम पंचायत कार्य समिती
  • महानगर व नगर भाग:

  • महानगरपालिका कार्य समिती
  • नगरपालिका कार्य समिती
  • शहर कार्य समिती
  • वार्ड कार्य समिती
  • व्यापक कार्यासाठी:

  • मिडीया सेल
  • आय.टी. सेल
  • मिडीया प्रभारी
  • पदाधिकारी अधिकार

    अध्यक्ष :-

    • नियुक्त अध्यक्ष हेच कार्यकारिणीचे अध्यक्ष असतील.
    • कार्यकारिणीच्या बैठकीचे अध्यक्षपद यांचेकडेच राहील.
    • प्रभारी यांच्याशी सल्लामसलत करून पदाधिकारी यांच्या नियुक्ती व बरखास्ती.
    • कोणत्याही पदाधिकारी यांच्याशी विचार विमर्श न करता स्वतः निर्णय घेऊ शकतात.
    • संपूर्ण कार्यकारिणी नियोजित व संचालीत करण्याची जबाबदारी असेल.
    • कोणत्याही विवादावर अध्यक्षांचा निर्णय अंतिम असेल आणि तो सर्वांना मान्य असेल.

    प्रभारी :-

    • अध्यक्षाचा प्रतिनिधि म्हणून संघटनेचे संयोजन / मार्गदर्शन करणे व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन चालणे.
    • अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्त्या करणे.
    • अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या पदाधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात कार्यवाही करणे.

    उपाध्यक्ष :-

    • अध्यक्षांच्या अनुपस्थितीत बैठकांचे अध्यक्षपद भूषविणे व चर्चा करणे.
    • अध्यक्षांच्या अनुमतीने संस्थेचे कार्य पुढे नेणे.

    महामंत्री :-

    • अध्यक्षाच्या अनुमतीने बैठका आयोजित करणे.
    • संस्थेच्या वतीने सर्व बील व व्हाऊचर पारित करून त्यांचे रेकॉर्ड ठेवणे.
    • संस्थेचे ऑडीट करून रेकॉर्ड सुरक्षित ठेवणे.
    • कार्यकारिणी बैठकीच्या सुचना पाठवणे व मिनीट बुक तयार ठेवणे.
    • अध्यक्षांच्या निर्देशानुसार सर्व संबंधीत पदाधिकाऱ्यांना माहिती देणे व अध्यक्षांना प्रत्येक माहिती यथासमय सांगणे.
    • लेखापरिक्षण अध्यक्षांच्या अनुमतीने बैठकीत मांडणे व पारित करणे.

    कोषाध्यक्ष :-

    • संस्थेचा संपुर्ण आर्थिक व्यवहार चोख ठेवणे.
    • संस्थेच बँक प्रणाली नियमीत संचालीत ठेवणे.
    • संस्थेच्या आय-व्ययाची रेकॉर्ड सुरक्षित ठेवणे व कोष सांभाळणे.

    मंत्री :-

    • संस्थेच्या वेगवेगळ्या मंत्र्यांना कार्याचे वाटप अध्यक्ष व प्रभारी यांच्या सहमतीने केले जाईल. हे कार्य करणे मंत्र्यांना बाध्य राहील.

    सहप्रभारी -

    • संस्थेच्या वेगवेगळ्या प्रभारी यांना कार्याचे वाटप अध्यक्ष व प्रभारी यांच्या सहमतीने केले जाईल व ते त्यांना बाध्य राहील.

    कार्यालय प्रभारी -

    • कार्यालय प्रभारी याचे अधिकार प्रभारी सारखेच असतील परंतु कार्यालयातील जबाबदारीचे.

    मिडीया प्रभारी -

    • मिडीया प्रभारी संस्थेचे कार्य प्रचार व प्रसार करण्यासाठी संचार माध्यम तसेच वर्तमानपत्रांना आवश्यक ती माहिती पुरवणे व यांचे संग्रहण करणे.

    संपर्क प्रमुख -

    • संपूर्ण कार्यक्षेत्राच्या अंतर्गत अध्यक्ष व प्रभारी यांच्या निर्देशानुसार वेगवेगळ्या भागात संपर्क करणे / संवाद वाढवणे / नव्या सदस्यांचा शोध घेऊन त्यांना संस्थेच्या कार्यात सहभागी करणे.

    कार्यकारिणी संख्याबळ

    पद नाम एकूण संख्याबळ
    अध्यक्ष१ (एक)
    प्रभारी१ (एक)
    महामंत्री१ (एक)
    कोषाध्यक्ष१ (एक)
    उपाध्यक्ष५ (पाच)
    सहप्रभारी५ (पाच)
    मंत्री५ (पाच)
    मिडीया प्रभारीप्रिंट माध्यम २ (दोन) / सोशल माध्यम २ (दोन)
    कार्यालय प्रभारी१ (एक)
    संपर्क प्रमुख१ (एक)
    कार्यकारिणी सदस्य२५ (पंचवीस)